मशिनमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सोयाबीन भरडण्याच्या मशिनमध्ये अडकून समाधान राऊत (वय 32) तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंगशी येथील राजाभाऊ साठे यांच्या शेतामध्ये सोयाबीन भरडण्याचे काम चालू होते. अडकलेले धान्य पायाने ढकलत असताना मशिनमध्ये ओढले गेल्याने कंबरेपर्यंतचा भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका गंभीर होता की पायाचे तुकडे होऊन ते मशीनमध्येच अडकून राहिले. या अपघातात समाधानचा जागीच मृत्यू झाला. समाधानच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

अलिकडे सोयाबीन उडीद सुगीच्या मोसमात अशा मशिनवर काम करताना अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत.परिणामी शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या मोसमात बार्शी तालुक्यातील काळेगाव आणि धामणगाव येथील युवकांना आपले हात गमवावे लागले होते तर खुंटेवाडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *