ब्रेकअप मागितला म्हणून त्याने प्रेयसीला संपवले

प्रेयसीने  नातं संपवायची गोष्ट केली म्हणून प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना अलीपूर परिसरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर जितेंद्र कुमारला( २१) ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

मृत मुलीचं नाव निक्की अग्रवाल (१६) असूल ती नॉर्थ डिस्ट्रीक्टमधील बुराडी  बाबा कॉलनीची रहिवासी आहे. निक्की रोज संध्याकाळी पाच वाजता शिकवणीला जाऊन सात पर्यंत घरी परत यायची. पण १ ऑक्टोबरला ती रात्रीपर्यंत घरी परतलीच नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी निक्की बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि २ ऑक्टोबरला सकाळी अलीपूर पुश्ता रोडला तिचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी निक्कीचे मोबाइल रेकॉर्ड्स तपासले असता शेवटचा कॉल जितेंद्रला केल्याचे कळले. जितेंद्र हा एक फोटोग्राफर असून त्याचे आणि निकीचे प्रेमसंबंध होते. निकीला हे संबंध संपवायचे होते तर जितेंद्रला मात्र निकीला दुसरा कोणीतरी प्रियकर मिळाला आहे अशी शंका आली होती. १ ऑक्टोबरला अलिपूर-पुश्ता रोडला जितेंद्नने निकीला भेटायला बोलावले. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. जितेंद्रला राग अनावर झाल्यामुळे त्याने तिला जवळच्या झुडपात ढकलले. तिथे कोसळून पडताच निकी किंचाळायला लागली. मग जितेंद्रने निकीचा गळा दाबून हत्या केली. जितेंद्रने निकीचा बलात्कार केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *