जळगाव महापालिकेवर राष्ट्रध्वज उलटा फडकला

शहर महापालिका प्रशासकीय इमारतीसमोर नित्यनियमाने फडकविण्यात येणारा राष्ट्रध्वज आज उलटा फडकला. हा प्रकार आयुक्‍तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ हालचाली करत राष्ट्रध्वज सरळ करत संबंधित कक्ष अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

महापालिका प्रशासकीय कामकाज सुरू असलेल्या दिवशी प्रशासकीय इमारतीसमोर रोज सकाळी राष्ट्रध्वज फडकविला जातो आणि सायंकाळी कार्यालयीन कामकाजानंतर ध्वज उतरविण्यात येतो. नित्यनियमाप्रमाणे आज सकाळी सातला राष्ट्रध्वज फडकला, तो उलटा फडकला. साधारण दोन-अडीच तास ध्वज उलटाच फडकत राहिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने राष्ट्रध्वज तत्काळ खाली उतरवून, सरळ करत फडकविला. आयुक्‍तांनी या प्रकाराची दखल घेत कक्ष अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्यास निलंबित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *