घराला आग, वाढदिवशीच मुलीचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यात गारगोटी जवळील सोनारवाडीत एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तिचा वाढदिवस होता. ती आपल्या अभ्यासात दंग होती. अचानक घराला आग लागली. मात्र, तिला याची कल्पना नव्हती. ती माळावर शांतपणे अभ्यासात मग्न असताना घराने झपाट्याने पेट घेतला आणि होत्याचं नव्हतं झालं. वाढदिवशीच अपूर्वा ऱ्हाटवळ या शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू झाला.

तिच्या आयुष्यातील वाढदिवसच शेवटचा ठरला. घराला लागलेल्या आगीमुळे अपूर्वा घराच्या माळ्यावर असल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. ती जीवाच्या अंकाताने ओरडत होती. मात्र, तोपर्यंत घराने पूर्ण पेट घेतला होता. तिच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. या आगीत दुदैवाने या शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू झाला. घराच्या माळ्यावर अपूर्वा अभ्यास करत होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आलेय. मात्र, आगीचे कारण अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *