मंत्रालयात आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यावर लॅपटॉप उगारला

मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना आमदार बच्चू कडू यांनी लॅपटॉप फेकून मारण्याचा प्रयत्न केला.”स्पर्धा परीक्षा विद्यार्थी महामोर्चा”राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. महापरीक्षा पोर्टल हे स्पर्धा परीक्षाचे ढिसाळ नियोजन करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी खेळत असल्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

महापरिक्षा पोर्टलद्वारे गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता अधिकारी, नगरपरिषद नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असून, त्या अडचणी सोडविण्यासाठी फोन, ई मेलचा काहीही फायदा झाला नसल्याचं समोर आलं आहे.

अडचणी आणि तक्रारी

– बैठक व्यवस्था सामूहिक कॉपी करता येईल अशी आहे.

– पेपर दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे नसणे.

– दिलेल्या वेळे व्यतिरिक्त सुद्धा लॉगिन करून पुन्हा पेपर सोडवला जाऊ शकतो.

– याशिवाय मुलांच्या अडचणी सोडविण्यासाठी पर्यवेक्षक उपस्थित नसणे.

याबाबत प्रहार संघटनेनं मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन हे पोर्टल बंद करावे आणि पुन्हा सरकारच्या mpsc.gov.in या पोर्टल द्वारे सर्व परीक्षा घ्याव्यात, अशी विद्यार्थ्यांच्यावतीने मागणी करण्यात आलेय. येत्या 27 सप्टेंबरला पुण्यात, तर 1 ऑक्टोबरला मुंबईत विद्यार्थ्यांसोबत प्रहार संघटना आंदोलनात उभी राहणार आहे, अशी माहिती अॅड. अजय तापकीर यांनी दिली.

तसेच या आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य माहिती संचानालय संचालक प्रदीप पी. यांची मंत्रालयात भेट घेऊन कारवाईचीही मागणी केली. पण आमदार बच्चू कडू यांच्या प्रश्नांची उत्तरे न देता उडवाउडवीची  उत्तरं दिल्याने बच्चू कडू यांनी प्रदीप पी यांना फैलावर घेतल्याचं अजय तापकीर यांनी सांगितले. दरम्यान, उद्या हजारो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरणार आहेत, असे ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *