» १५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५
» तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका गरीब कुटुंबात जन्म झाला.
» वडील नावाडी होते. बालपण अतिशय गरिबीत गेले. लहानपणी वडिलांना हातभार लावण्यासाठी लहानपणी वर्तमानपत्र टाकले.
» मद्रास विद्यापीठातून १९५५ साली भौतिकशास्त्र आणि एयरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
» फायटर पायलट व्हायचे स्वप्न होते. पण एका क्रमांकाने प्रवेश मिळाला नाही.
» त्यानंतर भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संस्थेत ४० वर्ष संशोधक आणि विज्ञान प्रशासक म्हणून काम.
» भारताचा अंतराळ कार्यक्रम आणि सन्यासाठी विविध क्षेपणास्त्रे तयार करण्यात सिंहाचा वाटा.
» भारताच्या अणू चाचण्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली.
» भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले.
» भारताच्या ‘अर्जुन रणगाडा’ निर्मितीत सहभाग.
» त्रिशुल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग ही क्षेपणास्त्रे तयार करण्यात मोठा वाटा.
» २००१ साली निवृत्त झाल्यानंतर २००२ साली भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड. यासाठी सत्ताधारी भाजपा आणि विरोधक काँग्रेस या दोघांचाही पाठींबा.
‘भारतरत्न’चे मानकरी
» १९८१ पद्मभूषण पुरस्कार
» १९९० पद्मविभूषण पुरस्कार
» १९९७ भारतरत्न पुरस्कार
» १९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय
एकात्मता पुरस्कार
» १९९८ वीर सावरकर पुरस्कार
» २००० रामानुजन पुरस्कार
» २००७ किंग चार्ल्स २ पदक
» २००९ हूवर पदक
» शिवाय जगभरातील सात विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली.
काही गाजलेली पुस्तके
» इंडिया २०२०
» विंग्ज ऑफ फायर
» इग्नायटेड माइंड्स
» गायडिंग सोल्स
» टाग्रेट. ३ बिलियन
» टर्निग पॉइंट्स
» माय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स
» इंटू अॅक्शन
» द सायंटिफिक इंडियन
देशाने अण्वस्र्सज्ज व्हायला पाहिजे, हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत आपल्या सहकाऱ्यांना पटवून देण्यात सर्वतोपरी प्रयत्न करून ते त्यात यशस्वी झाले. भारताला समृद्ध देश म्हणून जगापुढे आणण्यासाठी अण्वस्र् क्रांतीबद्दलची त्यांची कारकीर्द अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.
शास्त्रज्ञ असूनही ते हळव्या मनाचे शीघ्र कवी होते. भारतीय संस्कृती आणि मानवतावादावर त्यांची गाढ निष्ठा होती. आपल्या संशोधनाच्या माध्यमातून काय करता येईल, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात काय घडतंय आणि पुढे काय घडू शकतं, यावर त्यांचा कायम कटाक्ष असायचा.

