स्वत:ला देवीचा अवतार मानणाऱ्या राधे माँविरोधात तिच्याच भक्तानं तक्रार दाखल केली आहे. बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबियातील सूनेनं ही तक्रार केली आहे. या कुटुंबानं आणि राधे माँने आपला हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुप्ता कुटुंब राधे माँचा भक्त आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार गुप्ता कुटुंबातल्या तरुणाशी तिचं लग्न ठरलं होतं. राधे माँच्या परवानगीशिवाय हे लग्न पार पडणं अवघड होतं. राधे माँनी या लग्नासाठी होकार दिला. मात्र, पीडितांच्या नातेवाईकांसमोर अनेक मागण्याही ठेवण्यात आल्या.
लग्नानंतरही पैशांसाठी पीडितेचा छळ सुरु झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींसह राधे माँवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

