नाशिकमध्ये सापडला जिवंत बॉम्ब?

नाशिकच्या एम.जी. रोडवर एका कपाऊंडच्या जवळ असलेल्या बेवारस बॅगमध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याचे वृत्त आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी तपासकरून ती बेवारस बॅग ताब्यात घेतली आहे. मात्र त्या बॅगेत बॉम्ब होता की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पंजाबच्या गुरदासपूरमधील दिनानगरमध्ये आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर या शहरात अलर्ट देण्यात आले. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास नाशिकच्या नाशिकच्या एम.जी. रोडवर एका कपाऊंडच्या जवळ एक बेवारस बॅग आढळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करून बॅग ताब्यात घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *