तीन दिवस ‘तो’ आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

तीन दिवस ‘तो’ आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता… पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

मुलुंडनजिक नाहूर गावात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. नाहूर गावातील ठाकूर प्रेम आशिष या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर विनोदिनी नागवेकर ही महिला तिच्या मतीमंद मुलासह राहत होती.

तीन दिवसांपासून नागवेकर यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. पण, आतून उत्तर मिळालं नाही की कुणी दरवाजाही उघडला नाही. परंतु आतून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं.

पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून दरवाजा तोडला असता विनोदिनी फरशीवर मृतावस्थेत आढळून आल्या. तर त्यांचा मुलगा विशाल हा स्वयंपाक घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी या दोघाना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक अहवालात प्रदीर्घ आजाराने विनोदिनी यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. तर विशालला अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *