सांगलीत आढळल्या इंग्लंडच्या जळालेल्या नोटा

सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात इंग्लंड देशाच्या पन्नास पौंडच्या शेकडो नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र जप्त केलेल्या नोटा ह्या परदेशी नोटाच आहेत काय ? याची तपासनी सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यानी दिली आहे.

मागील महिन्यातच पोलिसांनी सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात 34 लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

आता तर इंग्लॅण्ड देशाच्या पन्नास पौंडच्या शेकडो नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. या ठिकाणी नोटांच्या आकाराचे कोरे कागद ही सापडले आहेत. जप्त केलेल्या ह्या नोटा परदेशी आहेत की बनावट याची तपासणी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *