प्रो कबड्डी: मराठमोळा खेळाडू निलेश शिंदेची प्रकृती स्थिर

प्रो कबड्डी: मराठमोळा खेळाडू निलेश शिंदेची प्रकृती स्थिर

प्रो कब्बडीत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात जखमी झालेला मराठमोठा खेळाडू निलेश शिंदे याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. कोलकात्याच्या मेडिकल रिसर्च इनस्टिट्यूटच्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

दबंग दिल्ली विरुद्धच्या सामन्यात खेळत असताना दिल्लीच्या रोहित चौधरी या खेळाडूची पकड करताना निलेशच्या मानेला दुखापत झाली. ही दुखापत इतकी मोठी होती की निलेशला जागेवरुन हलणं देखील शक्य होत नव्हतं. अखेर स्ट्रेचरच्या सहाय्याने निलेशला मैदानाबाहेर नेण्यात आलं.

यानंतर निलेशला कोलकाता मेडिकल रिसर्च इनस्टिट्यूटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. निलेशची सध्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *