सापासोबतचा सेल्फी भलताच महागात, उपचारासाठी 96 लाखांचा खर्च!

सापासोबतचा सेल्फी भलताच महागात, उपचारासाठी 96 लाखांचा खर्च!

सॅन डिएगोमध्ये सापासोबत सेल्फी घेणं एका व्यक्तीला भलतंच महाग पडलं. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सापाचा चावला. त्यानंतर उपचारासाठी त्याला 150,000 डॉलर म्हणजेच 96 लाख 23 हजार 115 रुपये खर्च करावे लागले.

टॉड फॅसलरने एका झाडीत लपलेला साप बाहेर काढला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागला. त्याचवेळी साप त्याला चावला आणि महिनाभराच्या उपचारानंतर त्याला बिलाच्या रुपात मोठी रक्कम फेडावी लागली.

माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. साप चावल्याने शरीरला लकवा झाल्याचं मला वाटलं. माझी जीभ बाहेर आली होती आणि डोळे बंद होत होते, असं पीडित व्यक्तीने सांगितलं.

फॅसलर याच्याकडे एक पाळीव सापही होता, पण या हल्ल्यानंतर त्याने सापाला जंगलात सोडून दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *