पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सुपरहिट चित्रपट ‘बाहुबली’मधील प्रमुख भूमिका केलेला अभिनेता प्रभाष याने भेट घेतली.
पंतप्रधानांना भेटण्यासाठी ३५ वर्षीय अभिनेता प्रभाष आपले काका आणि अभिनेता कृष्णम राजू आणि काकू सोबत आला होता.
मोदी यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, आज ‘बाहुबली’ स्टार प्रभाष भेटला. फोटोमध्ये मोदी यांनी ‘बाहुबली’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्याची पाठ थोपटताना दिसत आहेत.
एका प्राचीन साम्राज्यासाठी दोघा भावांमध्ये झालेल्या युद्धाचे चित्रण करणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपटाने जगभरात ३५० कोटीपेक्षा अधिकची कमाई केली.
एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘बाहुबली’ १० जुलै रोजी रिलीज झाला.

