स्वप्नात भगवान शंकराचं दर्शन, पोलिसाने मागितली सुट्टी

उत्तर प्रदेशमच्या बुलंदशहरमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने श्रावण महिन्यात कावड घेऊन जाण्यासाठी सहा दिवसांची सुट्टी मागितली आहे. माझ्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि त्यांनी हरिद्वारला येण्यास व कावड घेऊन जलाभिषेक करण्यासाठी बोलावलं आहे, असं या पोलीस कॉन्स्टेबलचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर सध्या पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी सुट्टीसाठी केलेला अर्ज व्हायरल होत आहे.

५ ऑगस्ट रोजी पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी सुट्टीसाठी अर्ज केला. यामध्ये त्यांनी, भगवान शंकराचं कमंडलू माझ्या स्वप्नात येत आहे, मी शिवलिंगाच्या चारही बाजूंना साप देखील पाहिले. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला सहा दिवसांची सुट्टी मिळावी असं म्हटलं आहे.

श्रावण महिन्यात भगवान शंकराला जलाभिषेक करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी सुट्टी मागितली होती, त्यानंतर त्यांनी सुट्टीसाठी पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असं अलाहाबादचे पोलीस अधिकारी सुकर्ती माधव यांनी सांगितलं. तर, बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रमोद कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, विनोद कुमार यांनी माझ्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि त्यांनी हरिद्वारला येण्यास व कावड घेऊन जलाभिषेक करण्यासाठी बोलावलं असल्याचं कारण सांगत सहा दिवसांची सुट्टी मागितल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *