फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा बहाणा करत १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमधील एकाचं वय १८ असून, दुसऱ्याचं वय २२ वर्ष आहे. दोन्ही आरोपी पीडित तरुणीला आधीपासून ओळखत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणीशी संपर्क साधत फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी बाहेर जाऊया असं सांगितलं. तरुणी दोघांना ओळखत असल्याने लगेच तयार झाली.
दोघे तरुण तरुणीला घेऊन एका ठिकाणी गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपींनी यासंबंधी कोणाला काही सांगितलं तर जीवे मारु अशी धमकी पीडितेला दिली. आरोपी तरुणांनीच तरुणीला तिच्या घरी सोडलं. यानंतर तरुणीने डोंबिवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचा मत्सव्यवसाय असून दुसरा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.
