छातीत दुखू लागल्यानं भुजबळ जसलोकमध्ये दाखल

पीएमएलए कोर्टात जात असताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तात्काळ जवळच्याच जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गरज पडल्यास त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणीसाठी आज सकाळी छगन भुजबळ पीएमएलए कोर्टात जात होते. कोर्टात जात असतानाच अचानक त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे भुजबळांना तात्काळ जसलोकमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉ. मेहता यांच्या निरीक्षणाखाली भुजबळांवर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना पीएमएलए कोर्टानं दिलासा दिला आहे. ६ सप्टेंबर रोजी पीएमएलए कोर्ट याप्रकरणी निर्णय देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *