पांडवकड्याला गेलेल्या पर्यटकांवर गुन्हे

खारघरमधील  पांडवकडा   धबधब्यावर दुर्घटना घडू नये यासाठी खारघर पोलिसांनी हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र त्यानंतरही अनेक पर्यटक पोलिसांच्या मनाई आदेशाला न जुमानता पांडवकडा धबधब्यावर जात असल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे पोलिसांनी आता अशा पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी अशा आठ पर्यंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *