विमानात श्वसनाचा त्रास, ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

बंगळुरू येथून पाटणाला जाणाऱ्या एका विमानात श्वसनाचा त्रास झाल्याने एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं समजताच विमान हैदराबाद येथे उतरवण्यात आलं होतं, तेथून त्या चिमुकल्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.८) इंडिगो 6 ई 897 या विमानात ही घटना घडली. पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इंडिगो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास विमानातील कर्मचाऱ्यांना बाळाची प्रकृती बिघडल्याचं समजलं. विमानातील डॉक्टर बाळाची काळजी घेत होते. त्यानंतर तातडीने विमान हैदराबाद येथे वळवण्यात आलं. तोपर्यंत विमानतळावर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. बाळासोबत त्याचे आई-वडिलही होते. तेथून बाळाला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. या घटनेवर इंडिगोने दुःख व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *