ग्रीन टी
ग्रीन टी काही वेळासाठी पाण्यात उकळा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाका. चेहरा स्वच्छ करुन घेऊन त्यावर हा स्प्रे मारा. हे पाणी काही काळासाठी चेहऱ्यावर तसेच ठेवा. मग चेहरा गार पाण्याने धुवून त्यावर मॉईश्चरायझर लावा.
मध आणि ग्रीन टी
ग्रीन टीच्या बॅग ३ मिनिटासाठी उकळा मग त्या बाहेर काढून गार करा. मग त्यात मध टाका. मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. मग चेहरा गार पाण्याने धुवून टाका. मग टॉवेलने चेहरा स्वच्छ धुवा. हे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा.
कोरफड आणि ग्रीन टी
ग्रीन टीच्या बॅग उकळा आणि गार करा. मग यात कोरफडीचा गर मिसळा. हे मिश्रण एका बाटलीत ठेवा. हे मिश्रण कापसाने हळूवारपणे चेहऱ्याला लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर मॉईश्चरायझर लावून ठेवा.
लिंबू आणि ग्रीन टी
ग्रीन टी उकळून त्या गार करा. त्यात लिंबाचा रस मिसळा. कापसाने हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि पूर्ण वाळेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. वाळल्यानंतर गार पाण्याने धुवून टाका. मग मॉईश्चरायझर लावा. चांगले परिणाम दिसण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा.
ऑलिव्ह ऑईल आणि ग्रीन टी
ऑलिव्ह ऑईल अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील पुरळ जाण्यासाठीही त्याचा चांगला फायदा होतो. ग्रीन टी उकळून गार झाल्यानंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका. स्र्पे बॉटलमध्ये टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर फवारा. मग चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. मग गार पाण्याने चेहरा धुवून मॉईश्चरायझर लावा.