मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचं काम चालू असल्याने लहान वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही, अशी माहिती एमएसआरडी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. उद्यापासून सकाळी 10 ते 6 या काळात लहान वाहनांकडून टोलवसुली केली जाणार नाही, असंही शिंदेंनी सांगितलं.
दुरुस्तीचं काम सुरु असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल वसुली सुरु असल्याची बातमी दिली. दुरुस्तीचं काम आणि टोल वसुली यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दुरुस्तीचं काम सुरु असल्याने केवळ दोन दिवसांसाठी टोल बंद करणं शक्य आहे का, याबाबत माहिती घेतो, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर लहान वाहनांना टोल आकारला जाणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं.
खोपोली-पेण मार्गावर काही तासांपासून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, 19 जुलैला आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक दरडी हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

