नालासोपाऱ्यातील अट्टल गुंड गोविंद राणा पोलीस चकमकीत मृत्यू

नालासोपाऱ्यातील अट्टल गुंड गोविंद राणा याचा सोमवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. गोविंद राणाच्या नावावर पोलिसांत अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांना तो सोमवारी राधानगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गोविंद राणाला पकडण्यासाठी सापळा रचला होता.

मात्र, गोविंद राणा याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मंगेश चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गोविंद राणाचा मृत्यू झाला.

हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *