लातूर – शालेय पोषण आहारातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा

लातूरमध्ये शालेय पोषण आहारातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. जळकोट तालुक्यातील मंगरुळ गावात ही घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या पोषण आहारानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. दुपारी विद्यार्थ्यांना भात आणि वरण देण्यात आलं होतं. यानंतरच त्यांना त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *