मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी रात्रीपासूनच मुंबईसह राज्यात पुन्हा जोर धरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे.

मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची चांगलीच उघडझाप पाहायला मिळतेय. दादर, परळ, माटुंगा आणि वरळी या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे.

आज रविवार असल्यामुळे या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसतायत. तर दुपारी २.५६ मिनिटांनी ४.८२ मीटरच्या लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *