शिवशाही बस पुलावरील कठड्यावर चढली आणि …

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही स्लिपर कोच बसला आज पहाटे लातूर जिल्ह्यात मुरुडमध्ये अपघात झाला. कोल्हापूरहून नांदेडकडे जाणारी बस मुरुड जवळ येताच एका पुलावरील कठड्यावर चढली. भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस कठड्यावर चढली. बस पुलाखाली पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या अपघातात एक प्रवासी बाहेर फेकला गेला, राजेश देवसरकर असे या प्रवाशाचे नाव असून, ते यवतमाळचे रहिवासी आहेत. देवसरकर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या अपघातात आणखी तीन जण किरकोळ जखमी आहेत. या स्लिपर बसमध्ये तेरा प्रवासी होते.अपघातावेळी अडकलेल्या प्रवाशांना उजव्या बाजूच्या दारातून काढण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *