कोल्हापूर एमआयडीसीत सिलिंडर स्फोट, एकाचा मृत्यू

कोल्हापूर एमआयडीसीतील कंपनीत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. शिरोलीच्या के. इंडस्ट्रिज कंपनीत हा सिलिंडर स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर, दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेला व्यक्ती उत्तर प्रदेशचा निवासी आहे. या स्फोटात जखमी झालेल्या दोघांवर कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *