कोल्हापूर अंबाबाई दर्शन उद्यापासून बंद

कोल्हापूर अंबाबाई दर्शन उद्यापासून बंद

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर गुरुवारपासून (२३ जुलै) होणाऱ्या रासा​यनिक संवर्धन प्रक्रियादरम्यान दर्शन बंद राहणार आहे. दरम्यान, उत्सवमूर्तीचे दर्शन सुरू राहणार असून, संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑगस्टला दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे.

अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. १५ दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सध्या पर्यटक भाविकांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात अधिक आषाढ महिना असल्याने भाविकांची संख्या जास्त होती. त्यामुळे संवर्धनप्रक्रियेसाठी महिना संपण्याची प्रतीक्षा करण्यात आली होती. १५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. पर्यटक भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *