‘बजरंगी भाईजान’ तीन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये

‘बजरंगी भाईजान’ तीन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने तीन दिवसातच १०० कोटींचा पल्ला गाठला आहे. चाहत्यांच्या पसंती लाभत असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०२.६ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट १७ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २७.२५ कोटींची कमाई केली. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अनुक्रमे ३६.६० आणि ३८.७५ कोटींचा गल्ला जमवला.

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करून नवा विक्रम रचलेला आहे, असे  बाजार विश्लेषक कोमल नाहाता यांनी ट्विटरवरून सांगितले. १०० कोटींची कमाई करणारा सलमान खानचा हा आठवा चित्रपट आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमान खानसह करिना कपूर, नवाजु्द्दीन सिद्दीकी आणि लहान मुलगी हर्षाली मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *