दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वाती मलिवाल यांच्या नियुक्तीवरुन दिल्लीत नवा वाद समोर आला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वाती मलिवाल यांची नियुक्ती दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी रद्द केली आहे.
मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने नुकतीच मलिवाल यांची महिला आयोगाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. मात्र नायब राज्यपालांनी ही नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे या नियुक्तीच्या वादावरुन केजरीवाल आणि नजीब जंग पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्वाती यांच्या नियुक्तीप्रकऱणी केजरीवाल सरकारने राज्यपालांशी कोणतीही सल्लामसलत केली नसल्याचे नायब राज्यापालांच्या कार्यालयातून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मलिवाल यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्यपालांच्या अखत्यारित येत नसल्याचे केजरीवाल सरकारचे म्हणणे आहे.

