याकूब करणार राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रझाक मेमन आता स्वतः राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार आहे.

नागपूर – १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रझाक मेमन आता स्वतः राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार आहे. ही माहिती याकूब मेमनचा वकील अनिल गेडाम यांनी दिली.

याआधी याकूब मेमनची फाशीची शिक्षा कमी व्हावी, म्हणून त्याचा भाऊ सुलेमान मेमनने राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. आता याकूब स्वतः दयेसाठी अर्ज करणार आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज करता येतो, तसेच राज्यपालांच्या माध्यमातून हा अर्ज करण्यात येणार असल्याचे अनिल गेडाम यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या ३० जुलै रोजी निश्चित झालेली फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून याकूब मेमन याने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र  त्याची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे येत्या ३० जुलैला त्याला फाशी होणार अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *