पाण्याच्या टाकीत आढळला रुग्णाचा मृतदेह!

पाण्याच्या टाकीत आढळला रुग्णाचा मृतदेह!

तळेगाव येथील मायमर रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत एका रुग्णाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. आज्ञाराम रामेश्वर यादव (५५) असे या मृत रुग्णाचे नाव आहे.

सायकलवरून पडलेल्या आज्ञाराम यांना शुक्रवारी तळेगाव येथील मायमर रुग्णालयात उफचारासाठी दाखल केले होते. मात्र सोमवारी दुपारपासून आज्ञाराम रुग्णालयातून अचानक गायब झाले होते. त्यांची हरवल्याची तक्रारही त्यांच्या मुलाने तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला.

कर्मचा-यांचा संप असल्यामुळे सोमवारी मायमर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकही कामावर नव्हते. त्यामुळे आज्ञाराम हे त्या ठिकाणी कसे गेले हे अद्यापही गुढ ठरले आहे. त्यांनी आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *