पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करणं हा देशाचा अपमान : दिग्विजय सिंह

पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करणं हा देशाचा अपमान : दिग्विजय सिंह

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनेच्या विरोधानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करणं हा देशाचा अपमान आहे, असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर याबाबत भूमिका मांडली आहे.

शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगणाऱ्या बी एम पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करणं हा देशाचा अपमान आहे, असं ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जर इतिहास तज्ज्ञ होते, तर त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकावर आक्षेप का नाही घेतला, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुरदरेंना मिळालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’वर प्रश्न उभा केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *