मुरुड-जंजिराच्या महाळुंगे गावात शाळकरी विद्यार्थ्यिंनींवर एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यीनी जखमी झाल्या आहेत.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यीनींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गोळीबार कोणी आणि का केला याबाबतची कोणतीही माहिती मिळू शकलेली नसून पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

