वांद्रे येथील लिंकरोडवर असलेल्या केएफसीला भीषण आग लागली आहे. ही आग हवेने पसरल्याने केएफसीच्या बाजूला असलेल्या तीन दुकानांनाही आग लागली. शॉर्टसर्किटमुळ आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु असून अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पावसाच्या संततधारेतही आग भडकल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
लिंकरोडवरील केएफसीला भीषण आग

