शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत

राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.

तसेच चारा पिकासाठी २५ कोटी रूपयांची मदत उभारली जाईल, ही चारा डेपोसाठी वापरण्यात येईल. दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

मी पश्चिम महाराष्ट्राचा विरोधक नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात २००८ आणि २००९ साली झालेल्या कर्जमाफिचा सर्वात जास्त फायदा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *