कोयत्याने वार करून लांबवली सोनसाखळी

पोहण्यासाठी गेलेल्या दोघांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून, एकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. स्वारगेटपासून हडपसरच्या दिशेला जाणाऱ्या कॅनॉलवर धोबीघाट, नागझरीजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदसिंग टाक आणि भक्तीसिंग दुधाणी (दोघेही. रा. गुलटेकडी) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मन्ने (वय २४, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र शाहरुख खान कॅनॉल येथे पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहून झाल्यानंतर घरी परतत असताना आरोपी टाक याच्यासह चार जणांनी फिर्यादींना अडवले. आरोपींनी शाखरुखची बुलेट गाडी मागितली; परंतु त्यांनी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादी व शाहरुखला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार करून जखमी केले. शाहरुखच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.’ या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. सी. उसगावकर अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *