वऱ्हाडाचा ट्रक 60 फुटांवरुन नदीत कोसळला, 21 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 21  जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सध्या मिनी ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक लग्नासाठी सीधीच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. 60 फूट उंचीवरुन नदीपात्रात ट्रक कोसळला आहे. त्यामुळं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख, तर जखमींना  50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *