एकीकडे महाराष्ट्रात पावसानं पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसानं होत्याचं नव्हतं केलं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून उज्जैनमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे.
मुसळधार पावसामुळेमुळे क्षिप्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक मंदिरंही पाण्य़ाखाली गेली आहेत. शहारातील अनेक कॉलनींमध्ये पाणी शिरलं आहे. रेल्वे ट्रॅकवरही पाणी भरल्यानं अनेक गाड्याचा खोळंबा झाला आहे. तर बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे वीजपुरवठाही अनेकदा खंडीत होत असल्यानं बऱ्याच घरांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना साऱ्यांचीच पुरेवाट होत असल्यानं उद्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं जाहीर केला आहे.

