पोलिसांच्या सतर्कतेमुळं चिमुरडीच्या बलात्काराचा डाव फसला, आरोपीला अटक

पोलिसांच्या सतर्कतेमुळं चिमुरडीच्या बलात्काराचा डाव फसला, आरोपीला अटक

पाच वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला, नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या बिट मार्शल गस्तीमुळं पुढचा अनर्थ टळला आणि वीस वर्षांच्या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं.

घणसोलीतल्या घरोंदा कॉलनीमधून आरोपी राहुल पाटेकर यानं रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमाराला, पाच वर्षांच्या मुलीचं खाऊच्या बहाण्यानं अपहरण केलं होतं. नंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यासाठी तो तिला कोपरखैरणे-घणसोली रस्त्यावरच्या खाडीकिनारी लगत खारफुटीमध्ये घेऊन गेला.

यावेळी गस्तीवर असलेल्या बीट मार्शल बळीराम चव्हाण आणि दिपक गोळे यांनी या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेऊन त्यांनी आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *