औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद सैनिक किरण थोरात यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानच्या गोळीबारात किरण थोरात यांना वीरमरण आले. किरण थोरात हे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात असलेल्या फकिराबाद वाडी येथील रहिवासी होते. थोरात यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
