जुन्नरमध्ये प्रेमप्रकरणातून मारहाण, विहिरीत उडी घेऊन 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

जुन्नरमध्ये प्रेमप्रकरणातून मारहाण, विहिरीत उडी घेऊन 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत रोहिदास खंडू वामन यांच्या विहिरीत 17 वर्षांच्या अनिकेत रोहिदास साबळे या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून मारहाण झाल्याने निराश झालेल्या अनिकेत आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.

अनिकेतला 13 जुलै रोजी सकाळी काळवाडी येथील माजी सरपंच बबन ऊर्फ बाळासाहेब एकनाथ काकडे, सदानंद एकनाथ काकडे, भिकू किसन काकडे, सुनील पांडुरंग काकडे, दिलीप दगडू हांडे या पाच जणांनी इनोव्हा गाडीमध्ये नेऊन जबर मारहाण केली होती. ‘आमच्या मुलीच्या मागे फिरतो काय व तिची छेड काढतो काय’ असा दम देत अनिकेतला इलेक्ट्रिक केबलने जबर मारहाण केली होती.

त्याच दिवशी संध्याकाळपासुन अनिकेत बेपत्ता झाला. दुसर्‍या दिवशी दिवसभर शोध घेतल्यानंतरदेखील तो न सापडल्याने परिसरातील विहिरीत शोध घेतला. अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता पिंपळवंडीतील रोहिदास वामन यांच्या विहिरीत इलेक्ट्रिक मोटारखाली अनिकेतचा मृतदेह आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *