वडिलांनी विहिरीत ढकलले; नशिबाने तारले

घरगुती वादातून पतीने पत्नीसह दोन मुलांना विहिरीत ढकलून स्वत:ही गळफास घेतला. चिखली तालुक्यातील करवंड शिवारात ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत विहिरीतील पाइप पकडल्याने ८ वर्षाचा मुलगा बचावला तर इतर तिघांचाही मृत्यू झाला.

सतीष विष्णू दहातोंडे (३६), पत्नी संगीता (२८), मुलगा रूद्र अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत मोठा मुलगा कान्हा (८) बचावला आहे.

सतीशचे पत्नी संगीता यांच्याशी नेहमीच भांडण होत होते. २२ मार्च रोजी पुन्हा वाद झाला. गावापासून जवळच असलेल्या पळसखेड शिवारात फुलमळी नावाने त्यांचे शेत आहे. आता या प्रश्नाचा अंत करायचा म्हणून त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांना सायंकाळी शेतावर आणले. बहाणा करीत तिघांना विहिरीजवळ नेले व बेसावध असतानाच विहिरीत ढकलले. त्यानंतर गावात मित्राला फोन करून त्याने केलेल्या कृत्याची माहिती दिली व स्वत:ही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *