आम आदमी कॅन्टीन मध्ये अवघ्या १० रुपयात पोटभर आणि स्वच्छ जेवण

दिल्लीतील आम जनतेला आता ‘आम आदमी कॅन्टीन’ मध्ये अवघ्या १० रुपयात पोटभर आणि स्वच्छ जेवण दररोज जेवायला मिळणार आहे. स्वस्तात जेवण देण्याची ही योजना असून या योजनेत अवघ्या ५ ते १० रुपयांत सर्वसामान्यांना जेवण उपलब्ध होईल, असे आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष अशिष खेतान यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या योजनेला मंजूरी दिली असून दिल्ली सरकारच्या अखत्यारीत डीडीसी मार्फत अन्न आणि पुरवठा विभागातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे.

‘आम आदमी कॅन्टीन’ मध्ये विविध प्रकारचे आणि उत्तम क्वालिटीचे जेवण देण्यावर भर दिला जाणार आहे. ‘आम आदमी कॅन्टीन’ मध्ये दिल्लीतील १० लाख बांधकाम मजूर, पाच लाख फेरीवाले आणि चार लाखाहून अधिक असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

तामिळनाडू आणि ओदिशामधील अम्मा कँटीन बघितल्यानंतर ही योजना दिल्लीत राबवण्याचा निर्णय झाल्याचे खेतान यांनी सांगितले. येत्या एक- दोन महिन्यातच पहिल्या टप्प्यात या योजनेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला रुग्णालये, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये आणि व्यायसायिक हबमध्ये ‘आम आदमी कॅन्टीन’ सुरु केल्या जातील, असे ते म्हणाले.

Amma canteenतामिळनाडूतील लोकप्रिय ‘अम्मा कॅन्टीन

तामिळनाडूत जयललिता या मुख्यमंत्री असतानाच्या काळात ही योजना कार्यान्वित झाली. ‘अम्मा कॅन्टीन’ या लोकप्रिय नावाने हे कॅन्टीन ओळखले जाते. महापालिका आणि महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून ही कॅन्टीन चालविली जातात. ही सर्व कँटीन ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर चालविली जातात. या कॅन्टीनमध्ये माफक दरात म्हणजे एका रुपयात इडली व तीन रुपयांना एक प्लेट दहीभात मिळतो. सांबार-भाताची एक प्लेट पाच रुपयांना मिळते. दररोज सुमारे तीन लाख नागरिक या कॅन्टीनचा लाभ घेतात.

कॅन्टीनची सर्व जबाबदारी महिला बचत गटाकडे सुपूर्द केल्यामुळे तुलनेने खर्च कमी येतो. महाराष्ट्रातील झुणका-भाकर योजना असफल झाली तसे अम्मा कॅन्टीनचे होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. याचे संपूर्ण श्रेय महिला बचत गटाकडे जाते. या कॅन्टीनमुळे किमान पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.

दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात या राज्यांतील वरिष्ठ अधिका-यांनी अम्मा कॅन्टीनचा अभ्यास केला असून, अशी योजना राबविणे शक्य असल्याची शिफारस त्यांनी आपल्या सरकारला केली आहे. अम्मा कॅन्टीनमधील स्वच्छता, माफक दरात उपलब्ध असलेले खाद्य पदार्थ, त्यात वापरले जाणारे शुद्ध घटक यांमुळे मध्यमवर्गही या योजनेकडे आकर्षित झाला आहे. जगभर या प्रयोगाची चर्चा असून इजिप्त आणि नायजेरिया या देशांनी या योजनेची दखल घेऊन ती आपल्या देशामध्ये राबविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

तामिळनाडूतील लोकप्रिय ‘अम्मा कॅन्टीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *