जर्मन पोलिसांकडून खारीला अटक

जर्मन पोलिसांकडून खारीला अटक

खार आपला पाठलाग करीत असल्याची तक्रार एका जर्मन महिलेने केल्यामुळे पोलिसांनी त्या खोडसाळ खारीला अटक केली आहे. बुधवारी जर्मनीतील पोलिसांना वेगळाच कॉल आला. उत्तर ऱ्हाईन वेस्टफालिया भागातील बॉट्रॉप येथील तरुण महिलेने खार आपला पाठलाग करीत असल्याची तक्रार केली होती.

पोलीस घटनास्थळी गेले व खारीला पकडून त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी सायंकाळी काढलेल्या प्रेस नोटमध्ये खारीला पकडल्याचे वृत्त दिले व सोबत जोडलेल्या चित्रफितीत पोलीस खारीला मध पाजताना दाखविण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *