दादरमध्ये शॉपिंग मॉलजवळ गोळीबार

मुंबईच्या दादर परिसरातील एका शॉपिंग मॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. दादरच्या कॉसमॉस मॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीने बंदुकीच्या दोन फैरी झाडल्या. यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *