इच्छा मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने मरणासन्न व्यक्तीला मृत्यूपत्र तयार करण्यास अखेर परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना काही अटी-शर्तीही ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छा मृत्यूचा अधिकार मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे. केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचंही न्यायालयाने या निकालात नमूद केलं. त्यामुळे मरणासन्न व्यक्तीने इच्छा मृत्यूपत्र तयार केले असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही. दरम्यान, या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत
