ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री शम्मी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. डिझायनर संदीप खोसला यांनी आज सकाळी शम्मी यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. शम्मी यांनी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.

‘कूली नं. १’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांमध्ये शम्मी यांनी भूमिका साकारल्या होत्या. दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले. टेलिव्हीजन मालिकांमध्ये त्या अनेक वर्षे भूमिका करत राहिल्या. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही शम्मी यांच्या निधनाबद्दर टि्वट करून शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *