तरुणाची हत्या करून तरुणीवर बलात्कार

निर्जन जागी फिरायला गेलेल्या प्रेमी युगुलावर एका चोरट्याने केलेल्या हल्ल्यात यातील २६ वर्षीय तरुण मृत्यूमुखी पडला. तर, त्याच चोरट्याने या तरुणीवर बलात्कार केला. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

शहापूर येथील २६ वर्षीय गणेश दिनकर हा तरुण आपल्या मैत्रिणीसह सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ-टिटवाळ्याजवळ असणाऱ्या नालिंबी गावानजीक फिरण्यासाठी गेला होता. नेहमी निर्जन असणाऱ्या या परिसरात हे दोघे गप्पा मारत असताना तेथे आलेल्या एका चोरट्याने या दोघांकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. गणेशने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे संतापलेल्या चोरट्याने स्वत: जवळील बंदुकीने गणेशवर गोळी झाडली. ही गोळी वर्मी लागल्यामुळे गणेशचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर या चोरट्याने गणेशच्या मैत्रिणीवर बलात्कार केला व गणेशची दुचाकी घेऊन तो पसार झाला. या तरुणीने ग्रामस्थांच्या मदतीने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा टिटवाळा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *