अकोल्यात आगीत 40 झोपड्या भस्मसात

अकोल्यातल्या रामदासपेठ भागातल्या मातानगरमध्ये दुपारी भीषण आग लागली.

दुपारी बाराच्या सुमाराला लागलेल्या या आगीत, सहा सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग मोठ्या प्रमाणात भडकली.

या अग्नीतांडवात चाळीसहून अधिक झोपडया जळून भस्मसात झाल्या आहेत. या आगीत मोठी आर्थिक हानी झाली असली तरी सुदैवानं कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

या वस्तीच्या जवळपास चार शाळा आहेत. आगीची माहिती मिळताच या शाळांतल्या मुलांना सुट्टी देण्यात आली.

तसंच इथल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आगीची तीव्रता पाहता हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. अकोला महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पंधरा गांड्यांनी ही आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *