धुळे देवपुरातील स्टेडिअम भागातील साडीच्या दुकानासह झेरॉक्सचे दुकान गुरुवारी पहाटे चोरट्याने फोडले़ यात दिड लाख किंमतीच्या साड्या गेल्या आहेत़ तर झेरॉक्सच्या दुकानातून रोख रकमेसह कागद चोरुन नेले.
शहरातील वाडीभोकर रोडवर जिल्हा क्रीडा संकुला समोर सरला पाटील यांचे साईकृपा आणि पैठणी साडी सेंटरच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला. दुकानातून पैठणी साड्या आणि ५ हजार रोख चोरुन नेले. याप्रकरणी विलास दिपचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला़
झेरॉक्सचे दुकान फोडले
साडीचे दुकानात चोरी केल्यानंतर चोरटयाने जवळच असलेले ज्ञानेश्वर भटू कदम यांचे झेरॉक्स दुकानाकडे आपला मोर्चा वळविला. शटरचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातून रोख १० हजार लंपास केले. कदम यांच्या फिर्यादीवरुन पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़
