१३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारलं

बांगलादेशातील एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय,  या व्हिडीओत काही लोकांनी एका १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारल्याची घटना कैद झाली आहे.

हा व्हिडीओ त्याच लोकांनी बनवला आहे, ज्यांनी या मुलाला मरेपर्यंत मारलं. या लोकांना अटक करण्याची मागणी आता जोर धरतेय.

व्हिडीओत या मुलाला लोखंडी सळईने मारलं जातंय आणि तो आपल्या जीवाची भिक मागतोय. मुलाला मारणाऱ्यांनी त्याच्यावर व्हॅन चोरी करण्याचा आरोप लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलहट शहरातील एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, तसेच घटनेच्या चौकशीसाठी विशेष पथक बनवण्यात आलं आहे.

बांगलादेशात चोरांना मारण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असताता, मात्र या मुलाला क्रूरपणे मारहाण केल्याने लोकांमध्ये संतापाची लाट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *